गव्हाऐवजी मका खा, गरीबांवर सरकारची बळजबरी !

गव्हाऐवजी मका खा, गरीबांवर सरकारची बळजबरी !

उस्मानाबाद  – देशातील नागरिकांनी काय खावे, कोणते कपडे घालावे यावरुन देशातील काही स्वसंयघोषित संघटना नेहमीच जनतेवर सक्ती करण्याचा प्रय़त्न करतात. त्यामध्ये सर्वधर्मीय संघटना आल्या. त्यावरुन मोठे वादही होतात. आता मात्र महाराष्ट्र सरकारचं अशी सक्ती करत आहे अशी म्हण्याची वेळ आली आहे. गव्हाऐवजी मका खाण्याची सक्ती राज्य सरकारकडून केली जात आहे. त्याविरोधात नागरिकांमध्ये रोष आहे.

राज्यात गरीबांना स्वस्त धान्य दुकानातून महिन्याला गहू आणि तांदूळ दिले जातात. आतापर्यंत प्रत्येक व्यक्तीला प्रतिमहिना तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ दिले जायचे. मात्र जून महिन्यांपासून गव्हाचं प्रमाण कमी करण्यात आलं आहे. तीन किलो गव्हाऐवजी दोन किलो गहू आणि एक किलो मका दिली जात आहे. वास्तवीक कोल्हापूरसारखा भाग वगळला तर राज्यात कुठेही मकाची भाकरी किंवा चपाती करुन खाल्ली जात नाही. सरकारच्या या निर्णयावर गोरगरीब नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

मराठवााड्यामध्ये गहू, ज्वारी, बाजरी यांच्याच सर्सास वापर केला जातो. आता मकापासून चपाती बनवायची की भाकरी, आम्हाला ते बनवण्याचं प्रशिक्षण सरकारनं द्यावं अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहेत. मकावाटप पुढे किती दिवस चालणार आहे की यापुढे कायम मकाच दिली जाणार याबाबत काहीही माहिती दिली जात नाही. मकाऐवजी गरिबांना तेल स्वस्त धान्य दुकानातून द्यावे अशी मागणीही होतेय.

COMMENTS