मराठा आरक्षणावरुन विनायक मेटे आक्रमक, “विध्यार्थ्यांच्या परीक्षा थांबल्यात, तुम्हाला काय मलाई खायला बसवलं आहे का?”

मराठा आरक्षणावरुन विनायक मेटे आक्रमक, “विध्यार्थ्यांच्या परीक्षा थांबल्यात, तुम्हाला काय मलाई खायला बसवलं आहे का?”

मुंबई – शिवसंग्रामचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांनी आज पत्रकार परीषद घेऊन काँग्रेसचे नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली. मराठा आरक्षणावरुन त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मी वेळोवेळी सांगत होतो अशोक चव्हाण यांच्याकडून समितीचे अधिकार काढून घ्यावे परंतु असं झाल नाही. उलट त्यांना जास्तच अधिकार देण्यात आले. याचा फटका मराठा समाजाला बसला आहे. आणि हे राज्य सरकारचे अपयश असल्याची टीका विनायक मेटे यांनी केली आहे.

काय म्हणालेत विनायक मेटे?

मराठा समाजाला आरक्षण मिळावे याबाबत अनेक वेळा संघर्ष झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत वेळोवेळी माहिती दिली मात्र यांचे लक्ष नाही. मराठा उपसमीतीची अशोकराव चव्हाण यांच्याकडील ही जबाबदारी काढून घ्यावी . जर यात काय कमी जास्त झालं तर अशोक चव्हाण यांचा राजीनामा घेऊन सुद्धा काही उपयोग नाही. कर्तबगार माणसाकडे ही जबाबदारी द्यावी. सरकारने अनेक वेळा आमचं फक्त ऐकून घेतलं निर्णय घेतला नाही.सर्वोच्च न्यायालयात स्थगीती उठवण्यासाठी खंड पीठासमोर अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी अर्ज केला पाहीजे. ज्या खंडपीठाने आरक्षण फेटाळलं त्याच खंडपीठाकडे अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

27 तारखेला काही वाईट निर्णय झाला तर मंत्री मंडळाची उपसमिती जबाबदार राहील. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना कळकळीने विनंती करतो की तुम्हाला मराठा समाजाला न्याय द्यावं वाटत असेल तर अशोक चव्हाण यांच्यावर अवलंबून राहू नका. स्वतः पुढे येऊन काम करा आणि न्याय द्या. पाहिजे असेल तर आम्हाला सोबत घेऊ नका पण बैठक घेऊन रणनीती आखा. वकिलांची टीम तयार करा. वेगवेगळे काम त्यांना वाटून घ्या मागच्या वेळेस अस काही केलं नाही त्यामुळे 27 तारखेच्या याचिकेत असं काही होऊ नये यासाठी प्रयत्न करा. 25 ऑक्टोबरपर्यंत एक बैठक घ्या आणि निर्णय घ्या. विध्यार्थ्यांच्या परीक्षा थांबल्या आहेत मुलांनी कोर्टात का जावं? सरकारने कोर्टात जावे तुम्हाला काय मलाई खायला बसवलं आहे का? असा सवालही मेटे यांनी केला आहे.

विनायक मेटेंची दुष्काळावर प्रतिक्रिया

मी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मराठवाडा दौरा केला आहे. यावर्षी वाटलेलं की शेतकऱ्याला चांगले दिवस येतील पण असं काही दिसत नाही. आर्थिक तंगी झाली आहे. त्यामुळे आम्ही शिवसंग्रामच्यावतीने मागणी करतो की शासनाने जिल्हाधिकारी यांना सांगून विनाविलंब 50 हजार प्रति हेक्टरी मदत मिळावी.
पाहिजे तर नंतर अजून पंचनामे करा. आता जर शेतकऱ्यांना न्याय दिला नाही तर सरकारचं काय होईल सांगता येत नाही. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडू नका मायबाप सरकारला आमची विनंती आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शरद पवार आणि दोन्ही विरोधी पक्षनेते यांनी दौरे संपत आले आहे म्हणून लवकर मदत करा असंही मेटे म्हणाले आहेत.

ऊसतोड कामगारांवर प्रतिक्रिया

ऊस तोड कामगारांना गोपीनाथ मुंडे गेल्यानंतर कोणी नाही आहे. आम्ही आता यासाठी संघटना स्थापन केली आहे. सर्व ऊसतोड कामगार आता संप करणार आहेत सरकार आणि कारखानदार हा संप मोडण्याचा प्रयत्न करतील. ऊसतोड कामगारांचे सर्वच प्रश्न प्रलंबित आहेत. त्यांना न्याय मिळावा यासाठी शिवसंग्राम प्रयत्न करत आहे. त्यांना अजून विमा मिळाला नाही. पवार साहेब हे कारखानदारांचे प्रमुख आहेत ते जाणकार आहेत यामुळे सर्वांना विश्वासात घेऊन सर्वांना सोबत घेऊन आदरणीय पवार साहेबांना विनंती आहे की त्यांना न्याय द्या असंही मेटे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS