MPSC परीक्षा पुढे ढकलण्यात मुख्यमंत्री अनुकुल, बैठकीत मेमकी काय चर्चा झाली, विनायक मेटेंनी दिली माहिती!

MPSC परीक्षा पुढे ढकलण्यात मुख्यमंत्री अनुकुल, बैठकीत मेमकी काय चर्चा झाली, विनायक मेटेंनी दिली माहिती!

मुंबई – मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाजातील युवकांचे भवितव्य काय असणार याबाबत आज मराठा समाजातील काही नेत्यांची मुख्यमत्र्यांसोबत बैठक पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मराठा समन्वय समितीची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. या बैठकीला मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री अशोक चव्हाण तसेच मंत्री अनिल परब यांच्यासह खासदार छत्रपती संभाजी राजे व शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे व मराठा समाजातील नेते उपस्थित होते.

या बैठकीमध्ये मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या संदर्भातील 20 मुद्द्यांवर चर्चा झाली असून प्रमुख्याने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी तसेच शासकीय नोकरीमध्ये विद्यार्थ्यांना एक वर्ष आरक्षण वाढवून देण्यात यावे या प्रमुख मागण्यांवर चर्चा झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील तथा सकारात्मक असल्याचे विनायक मेटे यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS