मिलिंद एकबोटेंना पुणे पोलिसांनी केली अटक !

मिलिंद एकबोटेंना पुणे पोलिसांनी केली अटक !

पुणे – कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणातील संशयित आरोपी मिलिंद एकबोटे यांना आज अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. कोरेगाव-भीमा येथे १ जानेवारी रोजी शौर्यस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या अनुयायांवर हल्ला करण्यास चिथावणी दिल्याचा आरोप मिलिंद एकबोटेंवर ठेवण्यात आला आहे. अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी एकबोटे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

दरम्यान पोलिसांना तपासात सहकार्य करत नसून चौकशीदरम्यान जाणीवपूर्वक चुकीची आणि अर्धवट माहिती देत असल्यामुळे मिलिंद एकबोटे यांची पोलीस कोठडीतील चौकशी अपरिहार्य असल्याचे सांगत राज्य सरकारने त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाला सर्वोच्च न्यायालयात तीव्र विरोध दर्शवला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं त्यांचा जामीन अर्ज अखेर फेटाळला आहे. त्यानंतर पुणे पोलिसांनी एकबोटेंना तात्काळ अटक केली आहे.

COMMENTS