एमआयएमचा सर्वच पक्षांना धक्का, विधानसभेची पहिली यादी जाहीर!

एमआयएमचा सर्वच पक्षांना धक्का, विधानसभेची पहिली यादी जाहीर!

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहूजन आघाडीला सोडचिठ्ठी देणाय्रा एमआयएम पक्षानं आता सर्वच पक्षांना धक्का दिला आहे. एमआयएमसोबतची युती तोडण्याची अधिकृत घोषणा पक्षाचे प्रमुख
असदुद्दीन ओवैसी यांनी आजच केली. त्यानंतर त्यांनी लगेच विधानसभा निवडणुकीसाठीची पहिली यादी जाहीर केली आहे. एमआयएमने विधानसभा निवडणुकीसाठी वडगाव शेरी, नांदेड उत्तर आणि मालेगाव या तीन मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. पक्षाने वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून डॅनियल लांडगे यांना, नांदेड उत्तर मधून मोहम्मद फेरोज खान लाला यांना तर मालेगाव मध्य मुफ्ती मोहंमद इस्माईल यांना विधानसभेसाठी उमेदवारी दिली आहे.

दरम्यान एमआयएमनं राज्यातील सर्व पक्षांच्या आधीच उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामुळे वंचित बहूजन आघाडीसह सर्वच पक्षांना मोठा धक्का बसला आहे. एमआयएमने वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे ९८ जागांची मागणी केली होती. पुढे त्यात बदल करून किमान ७४ जागा तरी द्याव्यात, अशी विनंती केली होती. पण दोन वेळा चर्चा होऊनही जागांबाबतचा निर्णय होऊ शकला नव्हता. त्यामुळे एमआयएमने अखेर स्बळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.

 

 

 

 

COMMENTS