एमआयएमच्या पाच नगरसेवकांचे नगरसेवकपद रद्द् ?

एमआयएमच्या पाच नगरसेवकांचे नगरसेवकपद रद्द् ?

औरंगाबाद – महापालिकेतील एमआयएमच्या ५ नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या नगरसेवकांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा  आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिला आहे.महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात  येणार आहे. नगरसेवकपदाचा गैरवापर केल्याप्रकरणी ही  कारवाई करण्यात येणार असून नगरसेवकपद रद्द करण्यासाठी औरंगाबादचे आयुक्तांनी राज्य सरकारला प्रस्ताव सादर करणार आहेत.

दरम्यान फेरोज खान, विरोधीपक्ष नेता, जमीर कादरी – नगरसेवक, नासेर सिद्दीकी, गटनेता, साजेदा फारुखी, नगरसेविका सरबत बेगम, नगरसेविका एमआयएमच्या या पाच जणांचे नगरसेवक पद रद्द करण्याची शिफारस आहे. महापालिका अधिकाऱ्यांसोबत हे नगरसेवक नेहमीच दमदाटी करायचे,  योग्य भाषेत बोलत नव्हते, म्हणून काही अधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. याबाबतचा मुद्दा भाजपनंही उचलून धरला होता. त्यामुळे सर्वसाधारण सभेत महापौरांनी अखेर त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा आदेश दिला आहे.

COMMENTS