राज्य सरकारमधील मंत्र्याला ‘कोरोना’ची लागण, माजी खासदार आणि माजी नगरसेवकालाही ‘कोरोना’चा संसर्ग !

राज्य सरकारमधील मंत्र्याला ‘कोरोना’ची लागण, माजी खासदार आणि माजी नगरसेवकालाही ‘कोरोना’चा संसर्ग !

मुंबई – धक्कादायक माहिती समोर आली असून राज्य सरकारमधील मंत्र्याला ‘कोरोना’ची लागण झाली आहे. गेल्या आठवड्यात या मंत्र्याची पहिली ‘कोरोना’ चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना घरातच क्वारंटाईन करण्यात आले होते. चेकअपसाठी मंगळवारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर काल त्याची ‘कोरोना’ टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तसेच मंत्र्याचे निकटवर्तीय असलेले माजी खासदार आणि माजी नगरसेवक यांनाही ‘कोरोना’चा संसर्ग झाला आहे.

दरम्यान मंत्र्याच्या बंगल्यावरील 16 जण यापूर्वीच कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. तसेच मंत्र्याचे निकटवर्तीय असलेले माजी खासदार, त्या माजी खासदाराची पत्नी आणि माजी नगरसेवक यांनाही ‘कोरोना’ची लागण झाली आहे. संबंधित मंत्र्याला मुंबईतील सरकारी रुग्णालयात हलवले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. खबरदारी म्हणून मंत्र्याच्या सर्व कुटुंबीयांनाही आता क्वारंटाईन करण्यात आले आहे.

COMMENTS