संतप्त महिलेने चक्क मंत्र्यांची काॅलर धरुन विचारला जाब

पुणे – इंदापूर तालुक्याचे एका तरुणावर खोटा गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ संबंधित तरुणाच्या कुटुंबियांनी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानीसमोर आंदोलन सुरू केले होते. आंदोलकांची विचारपूस करण्यास आलेल्या दत्तात्रय भरणे यांच्यावर संतापलेल्या महिलेने चक्क भरणे यांची काॅलर धरुण त्यांना जाब विचारला.

याबाबत माहिती अशी की, रेडणी, ता.इंदापूर येथील प्रफुल्ल चव्हाण, सचिन तरंगे व त्यांच्या इतर साथीदारांवर इंदापूर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच्या निषेधार्थ संबंधित तरुणांच्या कुटुंबियांनी पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांचे निलंबन करावे, या मागणी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या भरणेवाडी, ता. इंदापूर येथील निवासस्थानासमोर आमरण उपोषण सुरू केले होते.

या आंदोलकांची भेट घेण्यासाठी सोमवारी सकाळी मंत्री भरणे आले असता संतप्त महिलेने चक्क भऱणे यांची काॅलर धरली. या व्हिडोओ काही वेळात सोशल मिडियावर वायरल झाली. यामध्ये संबंधित महिला २० वर्षे आमची पोरं घरदार सोडून तुमच काम करत्यात तुम्ही आमच्या पोरांवर खोटा गुन्हा दाखल केला , असा जाब विचारत आहे.

COMMENTS