‘या’ 12 जणांना महाविकास आघाडीकडून विधान परिषदेला संधी !

‘या’ 12 जणांना महाविकास आघाडीकडून विधान परिषदेला संधी !

मुंबई – विधान परिषदेतील राज्यपालनियुक्त 12 जागा भरण्यासाठी तिन्ही पक्षातील एकूण 12 नाव ठरली आहेत. या नावांची यादी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सादर करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यपाल या यादीवर शिक्कामोर्तब करणार की नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आज अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, परिवनह मंत्री अनिल परब आणि अमित देशमुख यांनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी या तिन्ही मंत्र्यांनी आपआपल्या कोट्यातील राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी राज्यपालांना दिली आहे.

दरम्यान राज्यपालांच्या भेटीनंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी ही यादी लवकरात लवकर मंजूर होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. राज्यपाल नियुक्त 12 नावांची यादी राज्यपालांना दिली. मुख्यमंत्र्यांचं पत्र आणि मंत्रिमंडळ ठराव यासह कायदेशीर बाबी नमूद करुन राज्यपालांना विनंती पत्र दिलं आहे सगळ्या कायदेशीर बाबींची पूर्तता करुन यादी सोपवली आहे, त्यामुळे राज्यपाल या यादीवर शिक्कामोर्तब करतील असा विश्वास असल्याचं परब यांनी म्हटलं आहे.

तसेच राज्यपाल यादी मंजूर करतील की नाही हा जर तरचा प्रश्न आहे. त्यावर आताच भाष्य करणं योग्य नाही, असं सांगतानाच आम्ही सर्व बाबींची पूर्तता करून यादी दिली आहे. त्यामुळे राज्यपाल त्यावर शिक्कामोर्तब करतील असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी प्रत्येकी चार-चार सदस्यांची नावं राज्यापालांना दिली आहेत. राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी जे निकष आहेत. त्या निकषानुसारच ही यादी महाविकास आघाडीकडून देण्यात आली आहे. राज्यपालांनी निकषाच्या आधारे सदस्यांची नावं नाकारू नयेत म्हणून ही खबरदारी घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

12 नावाच्या शिफारशीमधील नावं

राष्ट्रवादी

एकनाथ खडसे समाजसेवा आणि सहकार

राजू शेट्टी सहकार आणि समाजसेवा

यशपाल भिंगे साहित्य

आनंद शिंदे कला

काँग्रेस

रजनी पाटील समाजसेवा आणि सहकार

सचिन सावंत समाजसेवा आणि सहकार

मुझफ्फर हुसेन समाजसेवा

अनिरुद्ध वनकर कला

शिवसेना

उर्मिला मातोंडकर – कला

नितीन बानगुडे पाटील शिवव्याख्याता

विजय करंजकर – शिवसेना नाशिक जिल्हाध्यक्ष

चंद्रकांत रघुवंशी – नंदुरबार, पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे आमदार

 

COMMENTS