सिध्दिविनायक मंदिराचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा !

सिध्दिविनायक मंदिराचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा !

मुंबई सिद्धिविनायक मंदिराच्या अध्यक्षांना यापुढे शासनाकडून राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मंदिराचे अध्यक्ष सध्या शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर हे आहेत. त्यामुळे आदेश बांदेकर यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाला आहे. नुकत्याच ३ महामंडळाच्या नियुक्त्या करताना भाजपने शिवसेनेला विश्वासात घेतले नव्हते. त्यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेने यापुढे एकही महामंडळ न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता आदेश बांदेकर राज्यमंत्रीपदाचा दर्जा स्वीकारणार का? असा सावल केला जात आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी पंढरपूर संस्थानच्या अध्यक्षांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आलेला आहे. भाजपाचे अतुल भोसले पंढरपूर संस्थानचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे भोसले यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा मिळाला आहे. त्यानंतर आता  मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराच्या अध्यक्षांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. परंतु सध्या सुरु असलेल्या सेना-भाजपच्या नाराजीमुळे आदेश बांदेकर हे मंत्रीपदाचा दर्जा स्वीकारणार का याकडे लक्ष लागलं आहे.

 

COMMENTS