भाजपच्या माजी मंत्र्यामुळे काँग्रेसच्या वडेट्टीवारांना मंत्री पद

भाजपच्या माजी मंत्र्यामुळे काँग्रेसच्या वडेट्टीवारांना मंत्री पद

नागपूर – एक वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे भाजपने तिकिट नाकारले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या होत्या. मात्र, या बावनकुळे यांना तिकिट न दिल्याने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आणि वडेट्टीवार मंत्री झाले, कबुली खुद्द मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी दिली.

नागपुरातील महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासंघाच्या कार्यक्रमात काँग्रेस नेते व मंत्री विजय वडेट्टीवार फटकेबाजी केली. यावेळी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित होते. हीच संधी साधून वडेट्टीवारांनी बावनकुळेंच्या तिकीट कापण्यावरून तुफान टोलेबाजी केली.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचे पक्षाने तिकीट कापले. यामुळे सर्वांनाच धक्का बसला होता. याच प्रसंगाची आठवण काढत वडेट्टीवारांनी टोलेबाजी केली. चंद्रशेखर बावनकुळे यांचे तसेच त्यांचे तिकीट कापणाऱ्यांचे आभार मानले पाहिजे. नाहीतर विजय वडेट्टीवार मंत्री झाले नसते, असे वडेट्टीवार म्हणाले.

भाजपने चंद्रशेखर बावनकुळेंचे तिकीट कापले नसते तर भाजपचे १५-२० आमदार जास्त निवडून आले असते. आता भाजपचे १०५ आमदार आहेत. त्यात १० किंवा १५ आमदार वाढले असते तर भाजप आमदारांची संख्या १२० वर गेली असती, असा चिमटा वडेट्टीवारांनी काढला. “ज्याच्या मागे तेली, ज्याच्यासोबत तेली आणि ज्याला सोडतो तेली तो नेहमीच होतो खाली,’ असे म्हणत वडेट्टीवारांनी तेली समाजाच्या ताकदीचा परिचय दिला. भाषण संपताना शेवटी त्यांनी बावनकुळेंना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

COMMENTS