राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उस्मानाबाद अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदी तारेख मिर्झा यांची निवड !

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उस्मानाबाद अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदी तारेख मिर्झा यांची निवड !

उस्मानाबाद- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यक विभाग उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पदी माजी नगरसेवक तारेख मिर्झा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सलीम मिर्झा हे राष्ट्रवादीचे निष्ठावंत नेते व अनेक वेळा नगरसेवक झाले होते. त्यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र तारेख मिर्झा यांना स्विकृत नगरसेवक करण्यात आले होते. सक्रिय पणे मिर्झा काम करत असल्यामुळे पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाची धेय्य धोरणे सर्व सामान्यांपर्यंत पोहचविण्यसाठी प्रयत्न करत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभाग च्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती चे पत्र महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अ. गफ्फार मलिक यांनी जळगाव येथे दिले असुन या निवडीबद्दल आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हा मध्यवर्ती बॅक चेअरमन सुरेश बिराजदार, प्रदेश सरचिटणीस मकसुद शेख यांनी सत्कार केला आहे.

या निवडीबद्दल कळंब तालुकाध्यक्ष रामहरी शिंदे, राष्ट्रवादी चे जेष्ठ नेते राजेंद्र मुंडे, अॅड. प्रविण यादव, विकास बारकुल, पंचायत समिती सभापती दत्तात्रय सांळुंके, नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे, गटनेते श्रीधर भवर, नगरसेवक लक्ष्मण कापसे, सुभाष पवार, नगरसेविका सरला सरवदे, बागरेचा, युवक तालुकाध्यक्ष अरुण चौधरी, शहराध्यक्ष सागर मुंडे, माजी नगरसेवक निलेश होनराव, राष्ट्रवादी युवक कॉग्रेस च्या जिल्हाउपाध्यक्ष लखन गायकवाड, प्रशांत लोमटे, रमेश मोहिते अनंत बोराडे, आदीनी अभिनंदन केले.

COMMENTS