“भाजपच्या महापौरांना ध्वजारोहण करण्यापासून रोखा”

“भाजपच्या महापौरांना ध्वजारोहण करण्यापासून रोखा”

मीरा भाईंदरच्या भाजपच्या महापौर डिंपल मेहता यांना येत्या 15 ऑगस्टरोजी ध्वजारोहण करण्यासापून रोखा अशी मागणी शिवसनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. तसं पत्र त्यांनी मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त, ठाण्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांना लिहीले आहे. भाजपच्या महापौर डिंपल मेहता यांनी शहीदाचा अपमान केल्याचा आरोप सरनाईक यांनी पत्रामध्ये केला आहे.

याच आठवड्यामध्ये मीरा भाईंदर येथील मेजर दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झाले होते. असं असतानाही मीरा भाईंदरमध्ये एका भाजपच्या नगरसेवकाचा वाढदिवस धुमडाक्यात साजरा केला होता. या वाढदिवासाच्या पार्टीला मीरा भाईंदरचे भाजपचे आमदार नरेंद्र मेहता, त्यांच्या पत्नी आणि महापौर डिंपल मेहता यांनीही हजेरी लावली होती. यावरुन मेहता यांच्यावर माध्यमामधून जोरदार टीका झाली होती. तसंच या प्रकरणावरुन मेहता यांच्यावर समाजाच्या सर्वच स्तरातून संताप व्यक्त झाला होता. त्यामुळेच महापौरांना ध्वजारोहण करण्यापासून रोखावे अशी मागणी मेहता यांनी केली आहे.

COMMENTS