राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार हनुमंतराव डोळस यांचे निधन !

राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार हनुमंतराव डोळस यांचे निधन !

माळशिरस – माळशिरस विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विद्यमान आमदार हनुमंतराव डोळस यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे.  त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. गेली काही दिवसांपासून त्यांची प्रकृती जास्तच खालावली होती. त्यांच्या निधनामुळे जिल्ह्यासह राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान या मतदारसंघात गत दोन निवडणुकीत राष्ट्रवादीचे हनुमंतराव डोळस हे निवडून आले आहेत.
विधिमंडळाच्या विविध समित्यांवर सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. त्यांच्या जाण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतही मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

COMMENTS