स्फोटाच्या संशयित पार्सलवर शिवसेना आमदाराचं नाव !

स्फोटाच्या संशयित पार्सलवर शिवसेना आमदाराचं नाव !

बेळगाव – स्फोटाच्या संशयित पार्सलवर शिवसेना आमदाराचं नाव दिसल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कर्नाटकातील हुबळी रेल्वे स्थानकात काल म्हणजेच 21 ऑक्टोबररोजी स्फोट झाला होता.हुबळी रेल्वे स्थानकावर काल झालेल्या स्फोटात हुसेनसाब नईवाले हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. स्टेशनवर आलेल्या एका पार्सलमधील संशयित वस्तूच्या माध्यमातून हा स्फोट झाला होता. या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालं असून स्फोटाच्या संशयित पार्सलवर कोल्हापुरातील शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांचं नाव आहे.

दरम्यान काल आरपीएफच्या जवानाला अमरावती एक्सप्रेसमध्ये एक बॉक्स सापडला होता. तो बॉक्स संशयास्पद वाटल्याने त्याने तो प्लॅटफॉर्मवर आणला. हा बॉक्स त्याने रेल्वे स्टेशनवर खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या हुसेनसाब नईवाले याला उघडण्यास सांगितला. हा बॉक्स उघडताच स्फोट झाला आणि त्यात हुसेनसाब जखमी झाला. त्यानंचर आज अशाच पद्धतीच दुसरं पार्सल सापलं असून त्यावरस्फोटाच्या संशयित पार्सलवर शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांचं नाव आहे. त्यामुळे शिवसेना आमदार निशाण्यावर होते का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

COMMENTS