आमदार नीतेश राणेंना धक्का, न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय !

आमदार नीतेश राणेंना धक्का, न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय !

कणकवली – काँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांना उप अभियंत्याला मारहाण करण चांगलच महागात पडलं आहे. कारण राणे यांच्यासह स्वाभिमान पक्षाच्या 18 कार्यकर्त्यांना कणकवली न्यायालयाने नऊ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या सर्वांना 9 जुलै रोजी पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. काल सायंकाळी राणे यांच्यासह स्वाभिमानच्या
18 कार्यकर्त्यांना अटक केली होती. या सर्वांना आज दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी राणे यांच्यासह 18 कार्यकर्त्यांना कणकवली न्यायालयाने नऊ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान या सर्वांवर महामार्ग उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना धक्काबुक्की, चिखलाची अंघोळ आणि गडनदी पुलाला बांधून ठेवल्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी काल त्यांना अटक केली होती. आज न्यायालयात हजर केले असता
सरकारी पक्षाच्यावतीने अ‍ॅड. गजानन तोडकरी यांनी सात दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती. तसेच पोलिस प्रशासनाच्यावतीने त्यांनी उपअभियंत्यांना मारण्यासाठी कट रचला गेला, अशी बाजू मांडली. हा कट कुठे रचण्यात आला. या कटासाठी वापरलेल्या गाड्या जप्त करावयाच्या आहेत. बादल्या जप्त करावयाच्या आहेत त्यामुळे सात दिवसांची पोलिस कोठडी आवश्यक असल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यानंतर न्यायालयाने त्यांना नऊ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

COMMENTS