ब्रेकिंग न्यूज – विधान परिषदेच्या 3 जागांचे कल हाती !

ब्रेकिंग न्यूज – विधान परिषदेच्या 3 जागांचे कल हाती !

मुंबई – विधान परिषदेच्या चार जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. अजूनपर्य़ंत अधिकृतपणे निकाल जाहीर झाले नाहीत. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई शिक्षक मतदारसंघात लोकभारतीचे कपील पाटील विजयी झाले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यांना पाठिंबा आहे. तर मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसनेचे विलास पोतणीस आघाडीवर आहेत. त्यांनीही निर्णयक आघाडी घेतली आहे. यापूर्वी शिक्षकची जागा कपील पाटील यांच्याकडे होती. तर पदवीधरची जागा शिवसेनेकडे होती.

नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे हे आघाडीवर आहेत. किशोर दराडे हे विधान परिषदेवर नुकतेच निवडूण आलेले नरेंद्र दराडे यांचे बंधू आहेत. या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादीला फटका बसत असल्याचं चित्र पहिल्या फेरीत तरी दिसत आहे. तर कोकण पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी सुरू असून तिथल कल अजून हाती आलेला नाही.

COMMENTS