तुकाराम मुढेंच्या निषेधार्थ मनसे, ‘आप’च्या कार्यकर्त्यांचं अनोखं आंदोलन !

तुकाराम मुढेंच्या निषेधार्थ मनसे, ‘आप’च्या कार्यकर्त्यांचं अनोखं आंदोलन !

नाशिक – महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नाशिककरांवर लादलेल्या करवाढीतून शालेय मैदान देखील सुटले नाहीत, त्याचा निषेध करण्यासाठी  महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी महापालिका गेटवर क्रिकेट खेळून अनोखं आंदोलन केलं आहे. त्यांच्या जोडीला आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ढोल बाजाओ आंदोलन करुन तुकाराम मुंढे यांचा निषेध केला आहे. तसेच ही करवाढ मागे घेण्याची मागणी या कार्यकर्त्यांनी केली आहे.

दरम्यान मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील मालमत्ता कराबरोबरच जमिनीवरही कर लावल्यानं शालेय क्रिडांगणही त्यातून सुटले नाहीत. त्या करवाढीचा फटका शिक्षण शुल्क वाढीच्या रूपाने पालकांना बसणार आहे. त्याच्या निषेधार्थ मनसे विद्यार्थी सेनेनं आंदोलन केलं असून झोपलेल्या प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी आपने ढोल वाजवले आहेत. आप आणि मनसेनं एकत्रित आंदोलन केल्यामुळे तुकाराम मुंढे हे त्यांचा निर्णय बदलणार का हे आगामी काळातच समजणार आहे.

COMMENTS