मनसे विरुद्ध शिवसेना वाद रंगला, मनसे कार्यकर्त्यांनी पोस्टरवरुन संजय राऊतांचं नाव खोडलं !

मनसे विरुद्ध शिवसेना वाद रंगला, मनसे कार्यकर्त्यांनी पोस्टरवरुन संजय राऊतांचं नाव खोडलं !

मुंबई – ठाकरे चित्रपटाच्या स्क्रिनिंग दरम्यान रंगलेल्या मानापमान नाट्यानंतर मनसे विरुद्ध शिवसेना असा वाद रंगला असल्याचं दिसत आहे. मनसेनं संजय राऊत यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून मनसे कार्यकर्त्यांनी ठाण्यात वंदना टॉकीजबाहेर आंदोलन करत ठाकरे चित्रपटाच्या पोस्टवरुन संजय राऊत यांचं नाव खोडून निषेध नोंदवला आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळला असल्याचं दिसत आहे.

दरम्यान संजय राऊत यांनी ‘लहान मेंदूत अहंकाराचा कचरा साचला की संयम आणि कृतज्ञता या शब्दांचे मोल नष्ट होते. ठाकरे चित्रपटाचा हाच संदेश आहे’, असं ट्वीट केलं होतं. परंतु काही वेळानंतर राऊत यांनी हे ट्वीट डिलीट केलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून संजय राऊत यांनी दिग्दर्शक अभिजित पानसेंवर निशाणा साधल्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे राऊतांनी हे ट्वीट डिलीट केलं असल्याची माहिती आहे.

ठाकरे चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान बुधवारी रात्री दिग्दर्शक अभिजित पानसे आणि निर्माते संजय राऊत यांच्यात वाद झाला होता. दिग्दर्शक अभिजित पानसे हे चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग सुरू असताना तडकाफडकी उठून गेले. अपमानित झाल्याने पानसे हे तेथून उठून गेल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे हा वाद आता चिघळला असल्याचं दिसत आहे.

 

COMMENTS