अमरावतीच्या मनसे शहर प्रमुखावर नागपुरात हल्ला  !

अमरावतीच्या मनसे शहर प्रमुखावर नागपुरात हल्ला  !

नागपूर – मनसेचे अमरावतीचे शहर प्रमुख संतोष भद्रे यांच्यावर नागपुरमध्ये हल्ला करण्यात आलाय. भद्रे यांना उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. संतोष भद्रे यांनी प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांना फोनवरुन धमकी दिली होती. त्या धमकीची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. त्यामुळे प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनीच भद्रे यांच्यावर हल्ला केला असा संशय घेतला जातोय. मात्र याबाबत अजून अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. मात्र या हल्ल्यानंतर परिसरात काही प्रमाणात तणाव निर्माण झाला आहे.

COMMENTS