राज ठाकरे आणि विश्वजित कदमांच्या भेटीनं चर्चेला उधाण !

राज ठाकरे आणि विश्वजित कदमांच्या भेटीनं चर्चेला उधाण !

सांगली – मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांच्या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. रविवारी राज ठाकरे यांनी सांगलीचा दौरा केला आहे. या दौ-यादरम्यान त्यांनी विश्वजित कदम यांची भेट घेतली आहे. तसेच या दोघांमध्ये जवळपास अर्धातास चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या दोघांच्या या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात सध्या तर्कवितर्क लावले जात आहेत. राज ठाकरे सांगलीतील राजकीय वर्तुळात काही स्फोट तर घडवणार नाहीत ना अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय कट्ट्यावर सुरु आहे.

दरम्यान ही औपचारिक भेट झाली असून राज ठाकरे यांच्याशी अनेक वर्षांपासून स्नेह संबंध आहेत, तसेच त्यांनी भारती हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज पाहण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे राज ठाकरे यांची भेट झाली असल्याची प्रतिक्रिया विश्वजित कदम यांनी दिली आहे. तसेच यावेळी राज ठाकरे यांनी त्यानंतर माजी मुख्यमंत्री स्वर्गिय वसंतदादा पाटील यांच्या समाधीच दर्शन घेतलं. यावेळी काँग्रेसचे नेते प्रतीक पाटील आणि विशाल पाटील हे उपस्थित होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगलीत येऊन काँग्रेस नेत्यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

COMMENTS