माझ्यामुळेच विरोधकांमध्ये एकजूट – राज ठाकरे

माझ्यामुळेच विरोधकांमध्ये एकजूट – राज ठाकरे

रत्नागिरी   कुमारस्वामींच्या शपथविधी सोहळ्यात दिसलेल्या विरोधकांच्या एकजुटीचं श्रेय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्याकडे घेतलं आहे. ‘सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे, असं गुढीपाडव्याच्या सभेत मी बोललो होतो. एकत्र यावं, असं आवाहन मी केलं होतं. ही सर्व प्रक्रिया त्यानंतरच सुरु झाली असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला आहे. राज ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर असून त्यांनी आज नाणार प्रकल्पग्रस्तांची भेट घेतली आहे.  त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प नको आहे, त्यामुळे तो कुठेही घेऊन जा, धमक्या देऊ नका, असंही राज ठाकरेंनी सुनावलं आहे. देशात इतक्या राज्यांमध्ये किनारपट्टी आहे. मग नाणार प्रकल्प महाराष्ट्रात झाला नाही तर गुजरातला जाईल अशी धमकी कशी काय देतात? असा सवालही राज यांनी केला आहे. तसेच या प्रकल्पाबाबत शिवसेना जनतेची फसवणूक करत असल्याची जोरदार टीकाही राज यांनी यावेळी केली आहे.

COMMENTS