मुंबईतील मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डेंना अटक !

मुंबईतील मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डेंना अटक !

मुंबई – मुंबई महानगरपालिकेतील मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. कंत्राटदाराला मारहाण केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली असून कुर्ल्यातील सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामास दिरंगाई होत असल्यामुळे तुर्डे यांनी सरकारी कार्मचाऱ्यांना मारहाण केली होती. त्यामुळे त्यांना ही मारहाण भोवली असल्याचं दिसत असून आज त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान काल रात्री तुर्डे यांनी महापालिकेच्या कंत्राटदाराला मारहाण केली होती. याबाबत तक्रार केल्यानंतर आज सकाळी पोलिसांनी त्यांनी ताब्यात घेतलं आहे. मुंबई मनपा निवडणुकीमध्ये मनसेचे सात नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी सहा नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. तर यापैकी केवळ कुर्ल्यातील वॉर्ड क्रमांक १६६ मधून निवडणून आलेले संजय तुर्डे हेच आपल्या पक्षाशी एकनिष्ठ राहिल आहेत.

 

COMMENTS