लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची कृष्णकुंजवर बैठक !

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची कृष्णकुंजवर बैठक !

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, अविनाश अभ्यंकर असे मनसेचे अनेक नेते उपस्थित आहेत. या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा केली जाणार आहे. तसेच मनसेची भूमिका देखील स्पष्ट केली जाणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागलं आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी मनसे आणि राष्ट्रवादीमध्ये युती होणार असल्याची चर्चा गेली काही दिवसांपासून सुरु आहे. आम्हाला पक्षश्रेष्ठींकडून आदेश आले तर आम्ही राष्ट्रवादीसोबत जाण्यासाठी तयार आहोत अशी भूमिका मनसे नेत्यांकडून मांडण्यात आली होती. परंतु याबाबत अजून राष्ट्रवादीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे याबाबतही बैठकीमध्ये चर्चा केली जाऊ शकते असा अंदाज आहे.

COMMENTS