मनसेची मातोश्रीबाहेर पोस्टरबाजी, प्रशासनाला केलं आव्हान !

मनसेची मातोश्रीबाहेर पोस्टरबाजी, प्रशासनाला केलं आव्हान !

मुंबई – राज्याभरात प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे. यानंतरही प्लास्टिक वापणा-यांना 5 ते 25 हजारांचा दंड ठोठावण्यात येत आहे. प्रशासनानं अनेकांवर कारवाई केली आहे. परंतु शासनाच्या या प्लास्टिक बंदीला मनसेनं मात्र विरोध केला आहे. याबाबत मनसेनं मातोश्रीबाहेर पोस्टरबाजी करत उपरोधिक विरोध केला आहे. दंड वसूलीऐवजी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना वॉटरप्रूफ कापडी पिशवी द्यावी अशी मागणी मनसेनं केली आहे.

दरम्यान या पोस्टरच्या माध्यमातून मनसेनं पर्यावरण मंत्री, महापौर, पालिका आयुक्त आणि नगरसेवकांना प्लास्टिकला पर्याय उपलब्ध करुन देण्याचं आव्हान केलं आहे. समाज कार्यच करायचं असेल तर सामान्यांना त्रास न देता करा असं मनसेनं या पोस्टरमधून म्हटलं आहे. त्यामुळे मनसेचं आव्हान शासन स्वीकारणार का याकडे लक्ष लागलं आहे.

 

COMMENTS