मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज डोंबिवलीत, नगरसेवकांशी साधणार संवाद

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज डोंबिवलीत, नगरसेवकांशी साधणार संवाद

मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवस कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर आहेत आज (शुक्रवारी) सकाळी राज ठाकरे डोंबिवली दाखल झाले आहेत. 

आज दुपारी कल्याण डोंबिवली महापालिकेत नगरसेवकांशी तसेच विधानसभाक्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी बैठक घेणार आहेत. संध्याकाळी पाच वाजता राज ठाकरे डोंबिवलीत पत्रकार परिषद घेणार आहेत.

दरम्यान, मनसेच्या 6 नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. त्यामुळे या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

COMMENTS