हरिसालनंतर मनसेकडून भाजपला दुसरा नवा धक्का !

हरिसालनंतर मनसेकडून भाजपला दुसरा नवा धक्का !

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दुस-या टप्प्यातील सभांना आजपासून सुरुवात होत आहे. पहिल्या टप्प्यात नांदेड, सोलापूर, इचरकरंजी, सातारा, पुणे आणि महाडमधील सभा घेण्यात आल्या. या सभेदरम्यान राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. तसेच व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी भाजप सरकारची पोलखोल केली.

दरम्यान आजच्या सभेतही राज ठाकरे हे नवी पोलखोल करणार असल्याची माहिती आहे. याबाबत मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनी ट्वीट केलं असून यामध्ये त्यांनी अजूनही हरिसालच्या धक्क्यातून न सावरलेल्या भाजपला नवा धक्का देणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आजच्या सभेत राज ठाकरे हे भाजपला दुसरा कोणता नवा धक्का देणार आहेत. हे पाहणं उत्सुकतेचं ठरलं आहे.

COMMENTS