मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडेंच्या गाडीला अपघात !

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडेंच्या गाडीला अपघात !

मुंबई – मनसेचे सरचिटणीस आणि माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. दादरमध्ये हा अपघात झाला असून समोरून येणाऱ्या डम्परनं देशपांडे यांच्या इनोव्हा गाडीला धडक दिल्ली आहे. परंतु देशपांडे गाडीत नसल्याने सुदैवानं ते सुरक्षित आहेत. पक्षाच्या बैठकीनिमित्त जात असताना हा अपघात झाला झाला असल्याची माहिती आहे. दरम्यान शिवाजी पार्क पोलिसांकडे या घटनेचा सखोल तपास करण्याची मागणी संदीप देशपांडे यांनी केली आहे.

दरम्यान आज सकाळी ही घटना घडली असून संदीप देशपांडे हे पक्षाच्या बैठकीनिमित्त निघाले होते. परंतु ते गाडीत बसण्यापूर्वीच हा अपघात झाला आहे. या अपघातात गाडीचं मोठं नुकसान झालं असल्याचं दिसत आहे.

संदीप देशपांडे यांनी केलेल्या तक्रारीनंतर शिवाजी पार्क पोलिसांनी चौकसी सुरु केली आहे. याबाबत डम्परचा चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याची माहिती आहे.

COMMENTS