मनसे उपाध्यक्ष शालिनी ठाकरे यांचा झिंगाट डान्स !

मनसे उपाध्यक्ष शालिनी ठाकरे यांचा झिंगाट डान्स !

मुंबई – आता एक हटके बातमी…. मनसेच्या उपाध्यक्ष शालिनी ठाकरे यांच्याबाबतची. मुंबईत गोरेगवामध्ये ‘हा खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मनसे कामगार सेनेचे उपाध्यक्ष घनश्याम भरत परब यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमासाठी मनसे उपाध्यक्ष शालिनी ठाकरे यांना आमंत्रित करण्यात आलं होतं.

शालिनी ठाकरे यांच्यासह अभिनेत्री सायली संजीव यांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्थानिक महिलांसाठी काही विरंगुळ्याचे क्षण म्हणून काही खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये चांगला खेळ खेळणा-या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी बक्षिसांचंही वाटप करण्यात आलं. यावेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी असलेल्या डीजेच्या तालावर ठेका धरण्यापासून शालिनी ठाकरे वाचवू शकल्या नाहीत. त्यांनी झिंगाट सिनेमातील गाण्यावर डान्स केला तसंच महिलांसोबत फुगडीही धरली. पाहूयात शिलीनी ठाकरे यांचा झिंगाट डान्स…..

 

https://youtu.be/_2qAcAp1sMs

 

https://youtu.be/btj50-81doc

 

https://youtu.be/wVHiwubfTVI

COMMENTS