मनसेची विद्यार्थी सेना लागली निवडणुकीच्या कामाला, विविध पदांच्या नियुक्त्या !

मनसेची विद्यार्थी सेना लागली निवडणुकीच्या कामाला, विविध पदांच्या नियुक्त्या !

महाविद्यालयात पुन्हा एकदा निवडणुकीचे वारे वाहणार आहे.  त्या दृष्टीने राजकीय पक्षांच्या विद्यार्थी संघटना कामाला लागल्या आहेत. युवासेना, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, एनएसयूआय, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, एसएफआय या सर्व विद्यार्थी संघटना कमाला लागल्या आहेत.  काही काळापासून फारशी सक्रिय नसलेल्या मनसे विद्यार्थी सेनेने ही या निवडणुका जोमाने लढवण्याच ठरवलं आहे. या दृष्टीने विविध नियुक्त्या सुरू केल्या आहेत.

यातील एक महत्वाची नियुक्ती ही महेश ओवे या विद्यार्थी चळवळीतील नेत्यांची करण्यात आली आहे. महेश ओवे हे विद्यार्थी निवडणुकीतील चाणक्य म्हणून मनसे वर्तुळात प्रसिद्ध आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून विद्यार्थी चळवळीत महेश ओवे सक्रिय आहेत. विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न त्यांनी मनसे च्या माध्यमातून मार्गी लावले आहेत. तसेच या पूर्वी मुंबईतील महत्वाच्या महाविद्यालयावर मनसे चा झेंडा महेश ओवे यांच्या व्यूहरचनेमुळे फडकला आहे.

COMMENTS