मनसेचे पुण्यात अ‌ॅमेझॉनविरोधात खळखट्याक

मनसेचे पुण्यात अ‌ॅमेझॉनविरोधात खळखट्याक

पुणे – नो मराठी नो अ‌ॅमेझॉन या मोहिमेस अ‌ॅमेझॉन कंपनीकडून प्रतिसाद मिळाला नाही. तसेच कंपनीकडून मनसेला न्यायालयाचे नोटीस पाठविण्यात आल्याने आज पुण्यातील कोंढवा परिसरातील अ‌ॅमेझॉन कंपनीच्या कार्यालयाची मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली.

अ‍ॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरु केलेल्या मोहिमे अंतर्गत अ‍ॅमेझॉनविरोधात मुंबईत फलक लावण्यात आले आहेत. यावर ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’ असा मजकूर लिहण्यात आला आहे. मनसेकडून अ‍ॅमेझॉनच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर पोस्टर झळकावण्यात इशारा देण्यात आला होता. तुम्हाला महाराष्ट्रात आमची भाषा मान्य नाही. मग आम्हाला महाराष्ट्रात तुम्ही मान्य नाही, अशी तंबी मनसेने दिली होती.

दरम्यान, कंपनीने न्यायालयात धाव घेतली असता. न्यायालयाने मनसेला नोटीस पाठवून कंपनीच्या कामात अडथळा निर्माण करू नये, असे आदेश देण्यात आले होते. मनसेच्यावतीने ट्विट करून महाराष्ट्रात फक्त राजवट चालणार असे म्हणत आज आक्रमक भूमिका घेत पुण्यातील कार्यालयाची तोडफोड करण्यात आली.

COMMENTS