मोदी, अमित शाहांचं मिशन 2019, या राज्यांवर असणार विशेष लक्ष !

मोदी, अमित शाहांचं मिशन 2019, या राज्यांवर असणार विशेष लक्ष !

नवी दिल्ली – मिशन 2019 साठी आता सर्वपक्षीय नेते कामाला लागले आहेत. सर्वच पक्षांतकडून आतापासूनच देशातील प्रत्येक राज्यात आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न या पक्षांकडून सुरु आहे. मागील निवडणूक ज्या राज्यात पक्षाची ताकद कमी पडली आहे. त्या राज्यांवर सर्वच पक्षांच्या नेत्यांकडू विशेष लक्ष केंद्रीत केलं जात आहे. भाजपनंही याकडे फोकस करण्यास सुरुवात केली असून भाजपचं सर्वेसर्वा नेतृत्व असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहानीही मिशन 2019 ला सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात व मध्य प्रदेश या राज्यांतील जागा घटण्याची शक्‍यता असल्यामुळे तेथील किमान 50 हून जास्त जागा निवडून आणण्यासाठी या दोन्ही नेत्यांनी प्रयत्न सुरु केले असल्याची माहिती आहे.

दरम्यान मागील निवडणुकांमध्ये राज्यांतील यश कायम ठेवण्याचा निर्धार पक्षाने केला असून ज्याठिकाणी पक्ष कधीही नव्हता तेथील जागा मोठ्या प्रमाणावर आणण्याचंही लक्ष भाजपने 2019 मध्ये समोर ठेवलं असल्याची माहिती आहे.

प्रकाश जावडेकरांकडे देणार केरळ प्रभारीपदाची सूत्रं ?

दरम्यान पश्‍चिम बंगाल आणि केरळमध्येही भाजपनं लक्ष केंद्रीत केलं असल्याची माहिती आहे. पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकांत भाजपने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली व केरळातही डाव्या पक्षांचा हिंदू पार्टी हा शिक्का स्वतःकडे वळवून घेण्यात यश आल्याचं दिसत आहे. त्यामुळे केरळच्या राजकीय समीकरणांच्या पार्श्‍वभूमीवर तमिळनाडूचे प्रभारी राहिलेले केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केरळ प्रभारीपदाची सूत्रे दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या राज्यांवर असणार विशेष लक्ष 
आंध्र प्रदेश, तेलंगण, तमिळनाडू, ईशान्य भारत, केरळ व ओडिशिा या राज्यांवर भाजपचे विशेष लक्ष राहणार आहे. तसेच 2014 मध्ये ज्याठिकाणी भाजप दुसऱ्या क्रमांकावर होता, त्या 181 जागांचाही यामध्ये समावेश असून यातील आंध्र 25, केरळस 20, तमिळनाडू 39,  पश्‍चिम बंगाल 34 आणि तेलंगण 10 ते 12 या जागांवर भाजपचा डोळा आहे.

दरम्यान महाराष्ट्रातही शिवसेना-भाजपच्या युतीचा गोंधळ सुरु असल्यामुळे याठिकाणीही भाजपला मोठा फटका बसणार असल्याचं दिसत आहे. त्यामुळे शिवसेनेसोबतही भाजपची सध्या मनधरणी सुरु असून शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS