मोदीवर टीका करणे योग्य, देशावर टीका करणे चुकीचे – पंतप्रधान मोदी

मोदीवर टीका करणे योग्य, देशावर टीका करणे चुकीचे – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली  राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान मोदींनी लोकसभेत आभार प्रस्ताव सादर केला. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.देशात सर्वत्र अर्थसंकल्पाची चर्चा केली जात असताना विरोधकांकडून इव्हीएमच्या मुद्यावरून टीका केली जात आहे. मोदींवर टीका करणे चांगली बाब आहे. मात्र, देशावर टीका करणे चुकीचे असल्याचं यावेळी पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

दरम्यान काँग्रेसकडून विविध मुद्यांवर टीका केली जात असून त्यांच्याकडून न्यायपालिकेवरही टीका केली जात आहे. आता तर न्यायव्यवस्थेला धमकाविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचंही यावेळी मोदींनी म्हटलं आहे. सरकारचा पैसा भ्रष्टाचारावरील कारवाईसाठी खर्च केला जातो. निवडणुका आहेत म्हणून देशातील जनतेसमोर कामांचा लेखाजोखा आव्हानांना आव्हान देण्यात आम्ही पूर्ण ताकदीने पुढे आलोय. देश साडेचार वर्षांपूर्वी काय होता आणि त्याचा आता काय विकास झालाय हे आपण पाहत आहोत. जागतिक पातळीवर भारताचा क्रमांक 11 व्या क्रमांकावर होता आता हा क्रमांक सहाव्या क्रमांकावर गेला आहे. मोबाईल निर्मिती करणारा भारत जगात दुसऱ्या स्थानावर आहे. इंटरनेट डाटा सर्वात स्वस्त झाली असून, याचा वापरही जास्त होत आहे. असंही यावेळी पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

COMMENTS