आता साहित्यिक आणि विचारवंतही म्हणतायत मोदी सरकार घालवा !

आता साहित्यिक आणि विचारवंतही म्हणतायत मोदी सरकार घालवा !

मुंबई मोदी सरकारविरोधात आता साहित्यिक आणि विचारवंतांनीही उडी घेतली असून धर्मनिरपेक्ष भारत टिकून राहावा, भारतीय संविधान आणि त्यातील मूल्यांना धक्का लागू नये, असं ज्यांना ज्यांना वाटतं त्या सर्वांनी एकत्र येऊन मोदी सरकारला हटवण्याचं आवाहन केलं आहे. देशातल्या सद्यस्थितीबाबत साहित्यिक, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली असून एक पत्रक प्रसिद्ध करत लोकशाहीविरोधातील मोदी सरकार घालवण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. प्रज्ञा दया पवार, तुषार गांधी, कुमार सप्तर्षी, लोकेश शेवडे, विजय दिवाण, या साहित्यिक आणि विचारवंतांनी हे पत्रक प्रसिद्ध केलं आहे.

दरम्यान संविधानावर विश्वास असणारा प्रत्येक भारतीय आज अस्वस्थ आहे. देशातील नागरिकांना व्यथित करणाऱ्या घटनाच गेल्या चार वर्षात घडत आहेत. मग ती बीफच्या मुद्द्यावरुन अखलाकची हत्या असो, उत्तर प्रदेशातील उन्नावमधील बलात्कार किंवा जम्मूतील कठुआ गँगरेप असो, अशा उद्विग्न घटना घडत असताना, सरकार आरोपींना पाठिशी घालत असल्याचं दिसतं. तसंच हिंदुत्ववादी संघटनांमुळे हिंदू –मुस्लिम द्वेष पसरवला जात आहे. मात्र ही परिस्थिती बदलण्याची जबाबदारी नागरिक म्हणून आपल्यावर येते. त्यामुळे भारतीय लोकशाही टिकून राहावी असं ज्यांना वाटतं, त्यांनी एकत्र येऊन, हे लोकशाही-विरोधी सरकार गेलेच पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं आहे.

COMMENTS