नोटबंदी अपयशी ठरल्याची मोदी सरकारची कबुली !

नोटबंदी अपयशी ठरल्याची मोदी सरकारची कबुली !

नवी दिल्ली- भाजप सरकारनं केलेल्या नोटबंदीवर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. परंतु ही नोटबंदी अयपशी ठरली असल्याची कबुली आता खुद्द मोदी सरकारनंच दिली आहे. 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. परंतु हा निर्णय आता फसला असल्याचं केंद्रीय कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. नोटाबंदी निर्णयानंतर सधन शेतकऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागला होता.कारण, त्यांनाही मजुरांचे वेतन देण्यासाठी आणि शेतीच्या कामांसाठी पैशांची जुळवाजुळव करणे अशक्य बनले होते. सरकारने बी-बियाणे खेरदीसाठी 1000 आणि 500 रुपयांच्या जुन्या नोटांच्या व्यवहाराला परवानगी दिली होती. मात्र, बाजारात एक अस्थिरता निर्माण झाल्याने शेतकऱयांना संकटाचा सामना करावा लागला असल्याचं कृषी मंत्रालयानं एका अहवालात म्हटलं आहे.

दरम्यान वित्त मंत्रालयाशी संलग्नीत संसदेच्या एका स्थायी समितीच्या बैठकीत कृषी मंत्रालयाने नोटाबंदीच्या परिणामावर चर्चा केली आहे. रोकड नसल्याने किंवा कमी रोकड असल्यानं शेतकरी रब्बी हंगामा पेरणीसाठी खते आणि बी-बियाणे खरेदी करू शकले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दैनंदीन जीवनावर या नोटाबंदी निर्णयाचा विपरीत परिणाम झाला सल्याचं कृषी मंत्रालयाने म्हटलं आहे.

त्यामुळे गेली वर्षभरापासून मोदी सरकारकडून हा निर्णय देशहिताचा असल्याचे सातत्याने सांगण्यात येत होते. परंतु, आता नोटबंदी ही अपयशी ठरली असल्याची मोदी सरकारनेच कबुली दिली आहे.

COMMENTS