मोदीजी हे नवविवाहितेसारखे, जी फक्त बांगड्यांचा आवाज करते – नवज्योत सिंग सिद्धू

मोदीजी हे नवविवाहितेसारखे, जी फक्त बांगड्यांचा आवाज करते – नवज्योत सिंग सिद्धू

नवी दिल्ली – मोदीजी हे नवविवाहितेसारखे आहेत. जी फक्त बांगड्यांचा आवाज करते आणि त्यामुळे गल्लीतील बाकीच्या लोकांना वाटते की ती खूप काम करतेय. गेल्या पाच वर्षांपासून मोदी सरकारच्या काळातही हेच सुरू आहे”, असल्याची जोरदार टीका पंजाबमधील मंत्री आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी केली आहे. सिद्धू यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

दरम्यान मोदी हे खोटं बोलणाऱ्यांचे प्रमुख आहेत, ते भारताचे विभाजन प्रमुख आहेत आणि इतकंच नव्हे ते अंबानी आणि अदानी यांच्यासारख्या उद्योगपतींचे व्यवसाय व्यवस्थापकही आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे. गेल्या पाच वर्षांत  मोदी सरकार फक्त दिखावा करत आहे. प्रत्यक्षात काम काहीच केले जात नाही असंही सिध्दूंनी म्हटलं आहे. तसेच कालच्या सभेतही सिद्धू यांनी भाजपा म्हणजे ‘काळे इंग्रज’ असून त्यांना सत्तेबाहेर घालवण्यासाठी देश वाचवण्यासाठी मतदान काँग्रेसला मतदान करा असं आवाहन जनतेला केलं होतं.

COMMENTS