विरोधकांनी मोदी सरकारविरोधात सुरु केली वेबसाईट, वेबासाईटमध्ये घोटाळ्यांची यादी !

विरोधकांनी मोदी सरकारविरोधात सुरु केली वेबसाईट, वेबासाईटमध्ये घोटाळ्यांची यादी !

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये चांगलं वातावरण तापलं असल्याचं दिसत आहे. या दोन्ही पक्षांकडून सोशल मीडियाचा जोरदार वापर केला जात आहे. मागील निवडणुकीत भाजपनं सोशल मीडियाचा चांगलाच वापर केला असल्याचं पहावयास मिळालं आहे. परंतु विरोधकांनीही आता बदलता काळ पाहून सोशल मीडियावर भाजपविरोधात चक्क वेबसाईटच काढली आहे. www.corruptmodi.com अशी सुरु करण्यात आली असून यामध्ये ए ते झेड अशा कॅटेगरी असून त्या त्या अक्षराला क्लिक केल्यावर वेगवेगळ्या भ्रष्टाचारांच्या प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या लिंक देण्यात आल्या आहेत.

होमपेजवर घोटाळ्यांच्या ताज्या बातम्या आहेत आणि व्हिडीयो सेक्शनही देण्यात आला आहे. या साईटचं सध्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे, प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांच्या फक्त लिंक देण्यात आल्या असून वेगळे लेख, आरोप अथवा विरोधी नेत्यांची भाषणं वगैरे काहीही दिलेले नाही. त्यामुळे केवळ मोदी सरकारच्या काळात झालेल्या घोटाळ्यांच्या प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या लिंक एकत्र देणारी न्यूज अॅग्रिगेटर साईट असं या वेबसाईटचं स्वरूप आहे.

यामध्ये निरव मोदी घोटाळा, राफेल घोटाळा, पीडीएस घोटाळा, व्यापम घोटाळा, खाण घोटाळा, जय शाह घोटाळा, पियुष गोयल घोटाळा, मनरेगा घोटाळा, महाकुंभमेळा घोटाळा, बिटकॉइन घोटाळ्याची माहिती देण्यात आली आहे.

COMMENTS