राज्यातील सत्तेबाबत मोदी, शाहांचे महत्त्वपूर्ण निर्णय!

राज्यातील सत्तेबाबत मोदी, शाहांचे महत्त्वपूर्ण निर्णय!

नवी दिल्ली – राज्यातील सत्तास्थापनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यामध्ये बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत तडजोड करायची नाही असे या बैठकीत ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देणार नाही आणि देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री राहतील यावर या बैठकीत निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आहे.

शिवसेनेने पाठिंबा न दिल्यास राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाजपाची तयारी असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. शिवेसनेने पाठिंबा दिल्याशिवाय सत्तास्थापनेचा दावा करणार नाही असेही या बैठकीत ठरल्याची माहिती समोर येत आहे.

राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपाला शिवसेनेच्या पाठिंब्याची गरज आहे. तर शिवसेना मुख्यमंत्री पदावर ठाम असून राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत हातमिळवणी करण्यासाठी चाचपणी करत आहे. पण युतीलाच जनतेने कौल दिला असून आम्हाला विरोधात बसण्याचे जनमत असल्याचे शरद पवार यांची भूमिका आहे. त्यामुळे यावर आता कोणता निर्णय घेतला जाणार हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS