भाजप नेत्यांचं ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान, पंतप्रधान मोदींसह भाजप नेत्यांनी हातात घेतला झाडू ! VIDEO

भाजप नेत्यांचं ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान, पंतप्रधान मोदींसह भाजप नेत्यांनी हातात घेतला झाडू ! VIDEO

नवी दिल्ली – भाजप नेत्यांनी आज स्वच्छता ही सेवा या पंतप्रधान मोदींच्या अभियानाला सुरुवात केली आहे. या अभियानात देशभरातील नेत्यांनी सहभाग घेतला आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी हैदराबादमध्ये हातात झाडू घेऊन श्रमदान केलं आहे. तसेच सर्वांनी मिळून या अभियानात सक्रीय सहभाग घ्यावा असं आवाहन शाह यांनी देशातील जनतेला केलं आहे.

तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील बाबासाहेब आंबेडकर शाळेत हातात झाडू घेऊन स्वच्छता केली आहे. यावेळी मोदी यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून देत त्यांच्याशी संवाद साधला.

 

COMMENTS