राष्ट्रवादीबाबत विजयसिंह मोहिते पाटलांचं मोठं वक्तव्य!

राष्ट्रवादीबाबत विजयसिंह मोहिते पाटलांचं मोठं वक्तव्य!

पुणे – मी राष्ट्रवादीतच, कुठेही गेलो नव्हतो आणि जाणारही नाही,असं वक्तव्य विजयसिंह मोहिते पाटील यांनी केलं आहे. मांजरीच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूमध्ये सर्वोकृष्ट साखर कारखाना पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शरद पवारांच्या भेटीवर त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर शरद पवारांना पुण्यात भेटण्याआधी दोन तीन वेळा भेटलो असल्याचं, विजय सिंह मोहिते पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी राज्यातील दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर आले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, नवनिर्वाचित आमदार रोहित पवार, भाजपा नेते विजयसिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील तसेच साखर कारखानदार, ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

यावेळी विजयसिंह मोहिते पाटील आणि शरद पवार तब्बल सहा महिन्याच्या कालावधीनंतर एकाच मंचावर आले होते. शरद पवार इतर नेत्यांसोबत गप्पा मारत असतानाच विजयसिंह मोहिते पाटील तिथे पोहोचले. विजयसिंह मोहिते पाटील हे व्यासपीठावर येताच शरद पवार यांनी त्यांना समोरील खुर्चीवर बसण्यास सांगितलं. एवढच नाही तर यावेळी
या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 15 मिनिटं चर्चा झाली.

COMMENTS