महात्मा गांधींनी स्वातंत्र्य संघर्षाचा ‘ड्रामा’ केला, भाजप खासदार अनंत कुमार हेगडेंचं वादग्रस्त वक्तव्य!

महात्मा गांधींनी स्वातंत्र्य संघर्षाचा ‘ड्रामा’ केला, भाजप खासदार अनंत कुमार हेगडेंचं वादग्रस्त वक्तव्य!

मुंबई – स्वातंत्र्यादरम्यान केलेला संघर्ष हे महात्मा गांधी यांचं नाटक होतं असं वादग्रस्त वक्तव्य भाजपचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी केलं आहे. महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यादरम्यान केलेलं आंदोलन हे एक ड्रामा असल्याचं हेगडे यांनी म्हटलं आहे. कर्नाटकची राजधानी बंगळूरू येथील एका कार्यक्रमात बोलत असताना हेगडे यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.

दरम्यान महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्य संघर्षाचा ड्रामा इंग्रजांच्या सहमतीने करण्यात आला.त्या तथाकथित नेत्यांना पोलिसांनी एकदाही मारझोड केली नाही.तसेच काँग्रेसचे समर्थन करणारे लोक म्हणतात की, बलिदान आणि सत्याग्रहामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले हे सत्य नसून इंग्रजांनी सत्याग्रहामुळे हा देश सोडला नाही असंही हेडगे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS