भाजपच्या उमेदवाराचं चप्पलचे हार घालून स्वागत, पहा कसा झाला राडा, व्हिडिओ !

भाजपच्या उमेदवाराचं चप्पलचे हार घालून स्वागत, पहा कसा झाला राडा, व्हिडिओ !

मध्यप्रदेशात भाजपच्या एका विद्यमान आमदार आणि उमेदवाराला मतदाराच्या रोषाचा सामना करावा लागला.  नागाडा कचोडी विधानसभा क्षेत्राचे आमदार असलेले दिलीप शेखावत पुन्हा याच मतदारसंघातून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. काल प्रचाराच्या दरम्यान अनेक मतदार त्यांचं फुलांचा हार घालून स्वागत करत होते. त्यावेळी एका मतदाराने चक्क चप्पल असलेला हार शेखावत यांच्या गळ्यात घातला. एएनआय या वृत्तसंस्थेनं हा व्हिडिओ रिलीज केला आहे.

दिलीप शेखावत यांना तो व्यक्ती चप्पलचा हार घालत आहे हे सुरूवातीला लक्षात आलं नाही. त्यांनी तो गळ्यात घातला. मात्र गळ्यात घातल्यानंतर त्यांच्या लक्षात आल्यावर तातडीने तो त्यांनी बाहेर काढला. आणि त्या मतदाराला धक्काबुक्की केली. शेखावत हे 2013 मध्ये भाजपाच्या तिकीटावर निवडूण आले आहेत. त्यांना यावेळीही भाजपनं संधी दिली आहे. पहिल्याच यादीमध्ये त्यांचं नाव होतं.

COMMENTS