हीना गावित यांच्या गाडीवर हल्ला करणं पडलं महागात, चार जणांवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल !

हीना गावित यांच्या गाडीवर हल्ला करणं पडलं महागात, चार जणांवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल !

धुळे – भाजप खासदार हीना गावित यांच्या गाडीवर धुळ्यामध्ये मराठा आंदोलकांनी हल्ला केला होता. याप्रकरणी चार जणांवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती आहे. याप्रकरणी हीना गावित यांनी लोकसभेत हल्लेखोरांवर अॅट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांनी गाडीवर हल्ला करणा-या चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच याप्रकरणी हीना गावित यांनी पोलीस अधिक्षकांवर देखील कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांची बदली करण्यात आली होती.

दरम्यान मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी आपली बाजू मांडत घडलेला प्रकार अनावधानाने घडल्याचे सांगीतले होते. तसेच याप्रकरणात कोणालाही पाठीशी घालत नसल्याचं सांगितले होते. ‘आम्ही छत्रपती शिवरायांच्या विचारांचे आहोत. परस्त्रीचा सन्मान केला पाहिजे तिला माता भगिनी समान मानलं पाहिजे. कोणत्याही महिलेविरुद्ध मराठा समाजातील कोणताही कार्यकर्ता अशाप्रकारे कृत्य त्यांनी म्हटलं आहे. त्यानंतर गावित यांच्या गाडीवर हल्ला करणा-या चार जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

 

COMMENTS