भाजप खासदार कपिल पाटील यांच्यासह कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण !

भाजप खासदार कपिल पाटील यांच्यासह कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण !

मुंबई – राज्यात कोरोनाचा प्रसार वाढत असून काही नेत्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. भिवंडीतील लोकसभेचे भाजप खासदार कपिल पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे.कपिल पाटील यांच्यासह कुटुंबातील पत्नी, मुलगा, मुलगी, सून, पुतण्या यांच्यासह एकूण आठ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.कपिल पाटील यांना सौम्य लक्षणं असल्याने त्यांना घरातच क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

दरम्यान खासदार कपिल पाटील हे हायवे दिवे येथील निवासस्थानी येथे एकत्र कुटुंबात आपला मुलगा व तीन पुतणे यांच्यासह राहत आहेत. गावात मदतकार्य करत असताना कपिल पाटील यांच्या पत्नी यांना कुटुंबात सर्वप्रथम कोरोनाचा संसर्ग झाला. त्यांच्या संपर्कात आल्याने कुटुंबातील इतर सदस्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे.

यापूर्वी पुण्यातील दौंडचे भाजप आमदार राहुल कुल, पिंपरी चिंचवडचे भाजप आमदार महेश लांडगे आणि त्यांची पत्नी, हडपसरमधील भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर, मिरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन, नाशिकमधील राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्याचबरोबर पुण्यातील महापौर, उपमहापौर यांच्यासह भाजप आमदार मुक्ता टिळक आणि त्यांच्या आईला कोरोनाची लागण झाली होती. महापौर मुरलीधर मोहोळ यांनाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र कालच त्यांचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आला आहे.

COMMENTS