खासदार नवनीत राणांकडून मुख्यमंत्र्यांना अनोखे गिफ्ट!

खासदार नवनीत राणांकडून मुख्यमंत्र्यांना अनोखे गिफ्ट!

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. सह्याद्री अतिथीगृहावर जाऊन अनेक राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. खासदार नवनीत राणा यांनीही आज मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधत त्यांनी मुख्यमंत्र्यांना अनोखे गिफ्ट दिले आहे. आपल्या खासदारकीचा पहिला पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी त्यांनी दान केला आहे. विशेष म्हणजे नवनीत राणा यांनी दान केलेला पगार हा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दिला जाणार आहे.

दरम्यान मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्यासाठी विरोधी पक्षातीलही काही नेते सह्याद्री अतिथीगृहावर गेले असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
माण खटावचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे, अमरावतीच्या खासदार नवनित राणा आणि त्यांचे पती रवी राणा, तसेच शिवसेनेचे अणुशक्तीनगरचे आमदार तुकाराम काते यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS