उस्मानाबाद – विजयानंतर काय म्हणाले नवनिर्वाचित खासदार ओमराजे निंबाळकर ?

उस्मानाबाद – विजयानंतर काय म्हणाले नवनिर्वाचित खासदार ओमराजे निंबाळकर ?

उस्मानाबाद – उस्मानाबादमधून युतीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर 1 लाख 26 हजार मतांनी विजयी झाले. अटीतटीच्या ठरलेल्या उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील पारंपारिक लढतीत ओमराजे निंबाळकर यांनी एकतर्फी बाजी मारली. पोस्टल मतदान वगळता एक लाख 26 हजारांहून अधिक मतांनी राष्ट्रवादीचा पराभव करीत ओमराजे यांनी विजयश्री हस्तगत केला. या विजयानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उस्मानाबाद मतदारसंघात पद्मसिंह पाटील यांचा मुलगा राणा जगजितसिंह पाटील आणि त्यांचा पुतण्या ओमराजे निंबाळकर या दोन भावांमध्येच लढत झाली. दोन्ही भावांत काट्याची लढत पाहायला मिळाली. राणा जगजितसिंह पाटील हे राष्ट्रवादीकडून तर ओमराजे निंबाळकर शिवसेनेकडून लढले.

दरम्यान राणा जगजितसिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकर हे दोघंही 2014 च्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढले होते. त्यावेळी राणा जगजितसिंह यांचा विजय झाला आणि ओमराजे पराभूत झाले होते.

या मतदारसंघात मागच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या रवींद्र गायकवाड यांनी पद्मसिंह पाटील यांचा पराभव केला होता. पण शिवसेनेचे हे खासदार वादात सापडले. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला थप्पड मारल्याचं प्रकरण तसंच पोलिसांशी गैरव्यवहार अशा या ना त्या प्रकरणात ते वादात अडकले. त्यामुळे या वेळी शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली नव्हती.

काँग्रेसची मक्तेदारी या लोकसभा मतदारसंघात 1952 पासून 1996 पर्यंत 44 वर्षं काँग्रेसचं राज्य होतं. 1996 मध्ये ही जागा शिवसेनेने जिंकल्यानंतर काँग्रेसची मक्तेदारी मोडीत निघाली. उस्मानाबाद मतदारसंघात उमरगा, औसा, तुळजापूर, उस्मानाबाद, परांडा, बार्शी हे विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये उमरगा सोडलं तर बाकीच्या सगळ्या विधानसभा मतदारसंघांवर काँग्रेस – राष्ट्रवादीचा दबदबा आहे.

COMMENTS