परळी – वैद्यनाथ कारखाना येथे खा. डॉ. प्रितम मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात!

परळी – वैद्यनाथ कारखाना येथे खा. डॉ. प्रितम मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात!

परळी वैजनाथ – वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना लि., पांगरी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्या शुभ हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज वैद्यनाथ साखर कारखाना परिसरात सकाळी १० वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन झाला. यावेळी खा. डॉ. प्रितमताई मुंडे म्हणाल्या की, लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी या भागातील शेतकऱ्यांच्या हितासाठी वैद्यनाथ कारखाना उभारला आहे आणि साहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी ना. पंकजाताई मुंडे या जीवाचे रान करीत आहेत. वैजनाथ अतिशय चांगल्या पद्धतीने ऊसाचे गाळप करीत आहे. पाण्याअभावी ऊस वाळत आहे याची जाणीव आहे पण गाळप व्यवस्थित होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाला कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव अघाव, कार्यकारी संचालक जी. पी. एस. के. दिक्षीतुलू कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, विविध संस्थांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, पक्षाचे पदाधिकारी, कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, नागरिक व कर्मचारी, अधिकारी यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

COMMENTS