शिवराज सिंह चौहान यांच्या मंत्रीमंडळातील 31 पैकी तब्बल 13 मंत्र्यांचा पराभव !

शिवराज सिंह चौहान यांच्या मंत्रीमंडळातील 31 पैकी तब्बल 13 मंत्र्यांचा पराभव !

मध्य प्रदेशमधील भाजपचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना विधानसभा निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीमध्ये चौहान यांच्या मंत्रीमंडळातील 31 पैकी तब्बल 13 मंत्र्यांचा पराभव झाला आहे. एवढे मंत्री पराभूत झाल्यामुळे भाजप आणि शिवराज सिंह चौहान यांच्यावर तीव्र नाराजी दाखवली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. 

या मंत्र्यांचा झाला पराभव

अर्चना चिटणीस – 5120 मतांनी पराभव

उमाशंकर गुत्पा – 6587 मतांनी पराभव

ललिता यादव – 15779 मतांनी पराभव

शरद जैन – 578 मतांनी पराभव

जयंत मलैया – 798 मतांनी पराभव

आंतरसिंह आर्य – 15, 878 मतांनी पराभव

जयभान सिंह पवैया – 21044 मतांनी पराभव

लाल सिंह आर्य – 23989 मतांनी पराभव

रुस्तूम सिंह – 20849 मतांनी पराभव

दीपक जोशी – 13519 मतांनी पराभव

नारायण सिंह कुशवाह – 126 मतांनी पराभव

ओमप्रकाश धुर्वे – 35960 मतांनी पराभव

अजय सिंह – 6402 मतांनी पराभव

राजेंद्र सिंह -3747 मतांनी पराभव

रामनिवास रावत – 2840 मतांनी पराभव

दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय महासचिव कैलास विजय वर्गीय यांनी त्याबाबत वक्तव्य केलं आहे. या निवडणुकीसाठी उमेदवार ठरवण्यात चूक झाली असल्याची कबुली वर्गीय यांनी दिली आहे. व्यक्तिगत मोहापायी अनेकांना पुन्हा संधी दिली गेली. तसेच मंत्र्यांबाबत असलेली व्यक्तिगत अँटी इंकम्बन्सी भोवली असल्याचंही यावेळी कैलास विजय वर्गीय यांनी म्हटलं आहे.

COMMENTS