आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजेंना भाजपची ऑफर !

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजेंना भाजपची ऑफर !

सातारा – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांना भाजपनं ऑफर दिली असल्याची माहिती आहे. साता-यातून आगामी लोकसभा निवडणूकीसाठी राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना उतरविले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांनी आगामी लोकसभा निवडणूक भाजपकडून लढवावी अशी ऑफर भाजपचे नेते पुरूषोत्तम जाधव यांनी दिली आहे. याबाबत जाधव यांनी उदयनराजे यांना पत्र लिहिलं आहे.

दरम्यान खासदार उदयनराजे भोसले यांना तिसऱ्यांदा खासदार व्हायचे असेल तर त्यांनी आगामी लोकसभा निवडणूक भाजपकडून लढवावी असं पुरुषोत्तम जाधव यांनी म्हटलं आहे. तसेच सातारा जिल्ह्याचा खरोखरच विकास करायचा असेल तर भोसले यांनी भाजपकडून निवडणुक लढवावी. तरच ते तिस-यांदा खासदार होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी मंत्रिमंडळात स्थान मिळवतील. याबाबत उदयनराजेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी असंही जाधव यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS