खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी केली दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती !

खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी केली दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती !

पुणे –  राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चे दर्शन घेऊन आरती केली.  यावेळी संभाजी राजे छत्रपती यांनी गणपती उत्सव हा सुख शांती आणि आनंदाचा सण आहे. दगडूशेठ गणपती बाप्पाचे  दर्शन घेतल्या वर समाजात शांतता राखावी आमच्या सारख्या लोकांना काम करण्यासाठी प्रेरणा मिळावी अशी प्रार्थना केली. काल विविध क्षेत्राताली मान्यवरांनी गणपतीच्या  चरणी आपली श्रद्धा व्यक्त केली. शिवसेनेचे औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनीही काल श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं.

COMMENTS